Western Railway Megablock Mumbai: पश्चिम रेल्वेवर आज 300 लोकल फेऱ्या रद्द, 30 दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक, A टू Z माहिती
Western Railway Megablock Mumbai: कांदिवली-बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी 20 डिसेंबरपासून पुढील 30 दिवस वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.

Western Railway Megablock Mumbai: पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) वांद्रे टर्मिनस बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांदिवली-बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी 20 डिसेंबरपासून पुढील 30 दिवस वाहतूक ब्लॉक (Western Railway Megablock Mumbai) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 18 जानेवारी 2026 पर्यंत आहे.
सदर ब्लॉकमुळे 26 डिसेंबर रोजी रात्री 11 पासून 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 पर्यंत अप आणि डाऊन 26 डिसेंबर रोजी रात्री 11 पासून 27 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत कांदिवली दहिसरदरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली / अंधेरीच्या काही लोकल गोरेगावपर्यंतच धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली. या मार्गावरील सुमारे 300 लोकल फेऱ्या 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येतील. यामध्ये अप, डाऊन, जलद, धीम्या लोकल सेवांचा समावेश असेल. तर, बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या 14 लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.
मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या ब्लॉकचा फटका- (Western Railway Megablock Mumbai)
ब्लॉक कालावधीत अंधेरीच्या काही लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावतील. पश्चिम रेल्वेवर दिवसभरात सुमारे 1406 लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत असतात. ब्लॉक कालावधीत यापैकी 20 टक्के लोकल फेऱ्या रद्द होतील. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या आणि मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या ब्लॉकचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.























