एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही : पवार
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 10 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचं उघड झाल्यानंतर पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कर्जतमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
रायगड : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते. मात्र ते सत्तेत समाधानी असल्याचं जाणवत नाही, असे शरद पवार म्हणाले. शिवाय, उद्या कुणी सत्तेतून पाठिंबा काढला, तरी कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 10 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचं उघड झाल्यानंतर पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कर्जतमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीबाबत पवार नेमके काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते. मला वाटत ते सत्तेत समाधानी नाहीत, असं जाणवलं. पण पाठिंबा काढू असे काही ते म्हणाले नाहीत. मात्र उद्या कोणी पाठिंबा काढला तर आम्ही मदत करण्यासही उपलब्ध नसू.”, असे पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवार पुढे म्हणाले, “आमची भूमिका स्पष्ट आहे. कुणालाही मदत करायची भूमिका नाही. आमचा पक्ष समविचारी पक्षाबरोबर जाणारी भूमिका कायम मांडत राहिला आहे. उद्धव ठाकरेंबरोबर राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाली नाही.”
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीला शरद पवारांचा दुजोरा
केंद्रात एकाधिकारशाही वाढतेय, शरद पवारांचा घणाघात
सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement