एक्स्प्लोर
शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!
2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे.
मुंबई: शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. इतकंच नाही तर यापुढे देशातील प्रत्येक राज्यातील निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला. त्याला एकमताने संमती मिळाली.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.
2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठराव मी मांडतो, असं संजय राऊत म्हणाले. त्याला उपस्थितांनी हात वर करुन मंजुरी दिली.
या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे एकूण १३ नेते असतील
- मनोहर जोशी
- सुधीर जोशी
- लीलाधर ढाके
- दिवाकर रावते
- संजय राऊत
- रामदास कदम
- गजानन कीर्तीकर
- सुभाष देसाई
- आदित्य ठाकरे
- एकनाथ शिंदे
- चंद्रकांत खैरे
- आनंदराव अडसूळ
- अनंत गीते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement