एक्स्प्लोर
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये रामदास आठवलेंचा मेणाचा पुतळा
लोणावळ्यातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मेणाचा पुतळा बघायला मिळणार आहे.
मुंबई : लोणावळ्यातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मेणाचा पुतळा बघायला मिळणार आहे. या पुतळ्याचं सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
वॅक्स म्युझियामचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी रामदास आठवलेंचा हुबेहूब मेणाचा पुतळा बनविला आहे. आता हा मेणाचा पुतळा लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.
लोणावळ्यातील सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये अनेक जगप्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मेणाचे पुतळे आहेत. आता त्यांच्या पंक्तीत रामदास आठवलेही दिसणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement