एक्स्प्लोर

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही माहिती देण्यात आली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेचे ताकद वाढणार आहे. माजी दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर पोकळी भरुन काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजिवनी देणारा आहे. शिवसेनेने शंकरराव गडाख यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली आहे.

जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिन : शंकरराव गडाख "शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करुन यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिल," अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.

कोण आहेत शंकरराव गडाख? शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget