एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसीबीची सूत्र फणसाळकरांच्या हाती, मारियांना डावलल्याची चर्चा
मुंबई : सध्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सतीश माथूर लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्र स्वीकारतील. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्र अतिरिक्त आयुक्त विवेक फणसाळकरांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.
पुढील सूचना मिळेपर्यंत फणसाळकरच जबाबदारी सांभाळणार आहेत. या पदासाठी राकेश मारिया यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र मारियांऐवजी विवेक फणसाळकरांची अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याने, मारियांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे.
उद्या प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ संपणार असल्यामुळं पोलीस महासंचालकपदी सतीश माथूर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 1981च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सतीश माथूर यांच्या पाठीशी पोलीस सेवेचा मोठा अनुभव आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
Advertisement