एक्स्प्लोर
फुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेट
ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट मात्र फुटबॉलप्रेमानं एकत्र आली आहे. शनिवारी रात्री फुटसल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकमेकांची भेट घेतली.
![फुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेट Visit Of Aditya Thakre And Amit Thackeray In Mumbai Latest Update फुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/17095929/ADITYA-AMIT-WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमीलन कधी होईल माहित नाही. मात्र ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट मात्र फुटबॉलप्रेमानं एकत्र आली आहे. शनिवारी रात्री फुटसल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकमेकांची भेट घेतली.
लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी अर्धा ते पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यांनतर दोघांनी एकत्रित भोजन घेतल्याचीही माहिती आहे.
फुट्सल लीगचं आयोजन अमित ठाकरेंनी केलं होतं. या स्पर्धेसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यानुसार आदित्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर फुट्सल लीग ही फुटबॉल स्पर्धा अमित ठाकरेंची संकल्पना आहे
अमित ठाकरे स्वत: फुटबॉलपटू आहेत. तर आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोघांची भेट केवळ फुटबॉलप्रेमानं झाल्याचं सांगितलं जात आहे. पण आदित्य आणि अमित ठाकरेंच्या भेटीने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
![3](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/17095628/3.jpg)
![2](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/17095626/2.jpg)
![1](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/17095624/1.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)