एक्स्प्लोर
VIDEO: मित्रांनी कंपास पेटी आणि बेंचच्या सहाय्याने वाजवलं भन्नाट गाणं
'एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर' हे गाणं या दोन मुलांनी गायलं आहे. त्याला त्यांनी स्वत:च म्युझिक दिलं आहे. हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे कंपास पेटी आणि बेंच होय.

मुंबई: सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ ट्रेण्डिंगमध्ये असतात. यातील अनेक व्हिडीओ कॉमेडी, काही अपघाताचे, काही व्हिडीओ डान्स-गाण्याचे अशा विविध प्रकारचे असतात. असाच एक भन्नाट गाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ लहान मुलांच्या पहाडी आवाजातील गाण्याचा आहे. 'एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर' हे गाणं या दोन मुलांनी गायलं आहे. त्याला त्यांनी स्वत:च म्युझिक दिलं आहे. हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे कंपास पेटी आणि बेंच होय. सोलापूरच्या वैराग गावातल्या नवीन मराठी विद्यालयातील प्रणय घायतिडक आणि आसिफ पठाण अशी या दोघांची नावं आहेत. या दोघा मित्रांनी कंपास आणि बेंचच्या सहाय्याने 'एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर' हे गाणं गायलं आहे. पहाडी आवाज आणि कंपास-बेंचचं म्युझिकमध्ये गायलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर वाहवा मिळवत आहे.
मूळ गाणं दरम्यान, यूट्यूबवर या गाण्याचं मूळ व्हर्जन उपलब्ध आहे. रोहित पाटील अलिबाग यांच्या यूट्यूब अकाऊंटवर अपलोड असलेल्या या गाण्याला 1 कोटी 35 लाख 78 हजारांहून अधिक हिट्स आहेत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर... माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर, असं या गाण्याचे बोल आहेत. धनश्री घारे आणि रोहित पाटील यांनी हे गाणं गायल्याचं या व्हिडीओखाली नमूद आहे. महत्त्वाचं म्हणजे रोहित पाटील अलिबाग या यूट्यूब अकांऊंटचे सबस्क्राईबर्स तब्बल 70 हजारांहून अधिक आहेत. VIDEO:सोलापूरच्या वैराग गावातल्या नवीन #मराठी विद्यालयातील प्रणय घायतिडक-आसीफ पठाण या दोघा मित्रांनी कंपास-बेंचच्या सहाय्याने 'एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर' हे गाणं मस्त कंपोज केलंय!#म @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Marathi_Vishwa @Mazi_Marathi @BeyondMarathi pic.twitter.com/VdEPnbxzGF
— Suraj Borawake (@s_borawake) October 17, 2018
आणखी वाचा























