एक्स्प्लोर
लोकल 'माकडं' सापडली, स्टंटबाज टवाळखोरांना बेड्या
काल मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या 4 टवाळखोरांना ताब्यात घेतलं.

मुंबई: हार्बर मार्गावर स्टंटबाजी करणारे चार हुल्लडबाज अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यापैकी तीन जण कुर्ल्याचे तर एक जण मुंब्य्राचा रहिवासी आहे. हे चारही टवाळखोर धावत्या रेल्वेत दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट करत होते. त्याचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला होता.
मोहम्मद अली अमीर शेख (कुर्ला), मोहम्मद जैयिद शेख उर्फ जावेद (मुंब्रा), रोहित चौरसिया (कुर्ला), शाहबाज मोहम्मद जावेद खान (कुर्ला) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या चौघांपैकी एकाने प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशाच्या हातातून हिसकावलेला 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.
ही बातमी एबीपी माझाने दाखवत, त्यांचा शोध घेण्याचं आवाहन केलं होतं. अखेर काल मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या चार टवाळखोरांना ताब्यात घेतलं.
रविवारी दुपारी या तरुणांनी चुनाभट्टी ते जीटीबी नगर रेल्वे स्टेशन दरम्यान स्टंटबाजी केली होती. शिवाय स्टंटबाजी करतानाच त्यांनी एका प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला होता. त्यांची ही चोरी आणि संपूर्ण स्टंटबाजी त्यांनी स्वत:च शूट केली होती. इतकंच नाही तर त्यांनी आपलं हे कृत्य व्हिडीओच्या माध्यमातून पसरवलं होतं.
दरम्यान, अशा हुल्लडबाजांमुळे इतरांना जास्त त्रास होतो. नुकतंच अशा टपोऱ्यांनी चालत्या ट्रेनमधून लाथ मारल्यामुळे रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या ट्रॅक टेक्निशियनला जीव गमवावा लागला होता. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान 25 जुलैला सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला होता. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर आळा घालायला हवा. कारण हे स्वत:ची तर माती करुन घेतातच, पण त्यांच्यामुळे अन्य निष्पापांच्या जीवाला धोका आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: या हुल्लडबाजांना शोधा, लोकलमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
