एक्स्प्लोर
तुम्ही खाता ती गाजरं पायाने धुतली जातात!
एक भाजी विक्रेता चक्क आपल्या पायाने ड्रममध्ये गाजर कोंबत आहे. ड्रममध्ये असलेल्या पाण्यात गाजर टाकून ते स्वच्छ करण्यासाठी तो चक्क पायानं ते गाजर तुडवताना दिसतो.
विरार : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही गाजराचा ज्युस पिता, मात्र ही गाजरं कशी धुतली जातात, हे तुम्हाला माहित आहे का? मुंबईजवळच्या विरारमधील एक धक्कदायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एक भाजी विक्रेता चक्क आपल्या पायाने ड्रममध्ये गाजर कोंबत आहे. ड्रममध्ये असलेल्या पाण्यात गाजर टाकून ते स्वच्छ करण्यासाठी तो चक्क पायानं ते गाजर तुडवताना दिसतो.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग, स्थानिक यंत्रणा झोपा काढत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
अ जीवनसत्वाने ठासून भरलेलं, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं गाजर पायाने धुतलं जात असेल, तर कपाळावर हात मारुन घेणार की गाजर? गाजराला शुद्ध करण्याची ही नवीन टेक्निक विकसित केली आहे विरारमधल्या भाजी विक्रेत्याने...
ही गाजरं पहिल्यांदा पायाने धुतली, मात्र पुढच्या दोन वेळा हाताने धुणार असल्याचं लंगड समर्थनं संबंधित भाजी विक्रेता व्हिडिओमध्ये करताना दिसतो. हाताला लागत असल्यामुळे पायाने गाजरं धुतल्याचंही तो सांगतो.
आता व्हिडिओ वायरल झाला आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरु लागला. मग काय... ई... शी... याक... असे ईमोजीज पडू लागले. व्यापाऱ्यानेही माफी मागितली, पण सगळीकडे असंच धुतलं जात असल्याची 'रिअॅलिटी'ही सांगून गेला.
ज्या मुंबईत मेथीची भाजी गटाराच्या पाण्यात धुतली जाते, ज्या मुंबईत पालिकेची कारवाई टाळण्यासाठी माल गटारीत लपवला जातो. तिथे भाजी अशीच धुतली जाणार. आता, या भाज्यांचा ज्यूस बनवून आपलं आरोग्य सुधारायचं की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवावं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement