एक्स्प्लोर
व्हायरल सच : आकाश अंबानीच्या पत्रिकेची किंमत दीड लाख?
'आकाश अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका' अशा नावाने या पत्रिकेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडिओत सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका दिसत होती.
नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्या कथित लग्नाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आकाश अंबानींच्या नावे फिरणाऱ्या या पत्रिकेची किंमत दीड लाखाच्या घरात असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.
आकाश अंबानी यांच्या विवाहाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून, कोणतीही पत्रिका छापलेली नाही, असं 'रिलायन्स'ने सांगितल्याचं 'टाइम्स नाऊ'च्या वेबसाईटवरील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
'आकाश अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका' अशा नावाने या पत्रिकेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडिओत सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका दिसत होती.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या दिवशीच सोशल मीडियावर आकाश अंबानीची कथित पत्रिका व्हायरल झाली. मात्र ही पत्रिका म्हणजे अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement