एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
मुंबई :शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला आहे.
पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
प्रसाद लाड यांची राजकीय कारकीर्द
राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे विश्वासू
राष्ट्रवादीत असताना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काही काळ काम
म्हाडाच्या अध्यक्षपदीही काही काळ नेमणूक
भाजपची सत्ता आल्यावर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीविरोधात अपक्ष म्हणून लढले
या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, तरीही पराभव
पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश, मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख
विधानपरिषद पोटनिवडणूक : प्रसाद लाड यांची कारकीर्द
राणे-मुख्यमंत्र्यांमध्ये दोन तास चर्चा
काँग्रेसला सोडून एनडीएमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी रविवारी रात्री उशिरा 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळते.
राणेंच्या भेटीनंतर लगेचच 'वर्षा' बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजप उमेदवारावर शिक्कामोर्तब झालं.
संबंधित बातम्या
राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी
विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वर
राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement