एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता
विधानपरिषदेतील सभापतींच्या दालनात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह कुलगुरु संजय देशमुख यांना आमदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे निकालाची घोषणा झाल्यानंतर कुलगुरु संजय देशमुखांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाचे 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचं छातीठोकपणे आश्वासन देणारे विनोद तावडे, सपशेल तोंडावर पडण्याची शक्यता आहे. कारण आज विधानपरिषदेतील सभापतींच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडेंसह कुलगुरु संजय देशमुख यांना आमदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे निकालाची घोषणा झाल्यानंतर कुलगुरु संजय देशमुखांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपसाणीत विलंब होत असल्याने, विधानपरिषदेच्या सभापतींच्या दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, शिवसेनेचे अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर आमदार उपस्थित होते.
यावेळी आर्टस् आणि काही अभ्यासक्रमांचे 31 जुलैपर्यंत निकाल लावणं शक्य नसल्याचं खुद्ध विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीच मान्य केलं. तर चुकीचे निकाल लावण्यापेक्षा दोन दिवस उशीरा निकाल लागलेला बरा, असा बचावात्मक पवित्रा विनोद तावडेंनी घेतला.
त्यामुळे धनंजय मुंडे आणि अनिल परबांनी आक्रमक भूमिका घेत विनोद तावडेंवर जोरदार टीका केली. उशीरा निकाल लागणार असल्यामुळं, विद्यार्थ्यांना पुढील अभ्यक्रमच्या प्रवेशला मुकावं लागेल, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. तर शिवसेना आमदार अनिल परब यांनीही विनोद तावडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या बैठकीत कुलगुरू संजय देशमुख यांनाही आमदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे निकाल लागल्यानंतर कुलगुरूंची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी
पेपर तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला
पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद
मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!
31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement