एक्स्प्लोर
शॉर्टकट जीवावर, वसईत रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू
वसई रोड आणि नालासोपारा या दोन स्टेशन्सच्या मध्यभागी सिग्नलवर रेल्वे थांबली होती, त्यावेळी प्रवाशाला शॉर्टकटचा मोह आवरला नाही
वसई : रेल्वे प्रवासात शॉर्टकट घेणं दोन प्रवाशांच्या अंगलट आलं आहे. ट्रेनच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. वसई रेल्वे स्थानकाजवळ हे दोन वेगवेगळे अपघात घडले.
50 वर्षीय विनोद गगड हे व्यापारी राजस्थानहून मुंबईला येत होते. वसई रोड आणि नालासोपारा या दोन स्टेशन्सच्या मध्यभागी सिग्नलवर रेल्वे थांबली होती. वसईला थांबा नसल्यामुळे सिग्नलला ट्रेन थांबली असताना ते उतरले आणि ट्रेनच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गगड हे भिवंडीतील अजंठा कंपाऊंड, धामणकर नाका परिसरातील पुष्प प्लाझा या इमारतीत राहत होते.
दुसऱ्या घटनेत प्रमोद गुप्ता हा तरुण जखमी झाला आहे. कानात हेडफोन लावून रुळावरुन जाताना प्रमोदला लोकलची धडक बसली. या दोन्ही घटनांची वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement