एक्स्प्लोर
Advertisement
वसईत अधिकाऱ्याकडे 4 कोटींचे पाच फ्लॅट, दोन किलो सोनं
वसई : वसई-विरारमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या वाय. शिवा रेड्डीने तिथे सात वर्ष काढली, आणि जमवली कोट्यवधी रुपयांची काळी माया. विशेष म्हणजे आपलं बिंग फुटू नये म्हणून दोन्ही हातांनी लाचखोरी करणाऱ्या रेड्डीनं चक्क तक्रारदारालाच लाच देऊ केली. मात्र अँटी करप्शनच्या सापळ्यात रेड्डी अडकला आणि समोर आली डोळे पांढरे होतील इतकी माया.
एरवी अधिकारी लाच घेताना गजाआड होतात, पण रेड्डीनं नवा विक्रम रचला. हा पठ्ठ्या लाच देताना रंगेहाथ पकडला गेला. खरं तर तीन वर्षांसाठी वाय शिवा रेड्डी सिडकोतून वसईमध्ये प्रतिनियुक्तीवर आला. त्याने बांधकामाची कंत्राटं देताना नियम, कायदे पायदळी तुडवले. लाचखोरी केल्याच्या तक्रारी होत्या. पण राजकीय लागेबांधे असल्यानं रेड्डीला वसईतून 7 वर्ष कुणीही हलवू शकलं नाही. अखेर शिवसेना नेते धनंजय गावडेंनी रेड्डीचे कारनामे कागदोपत्री बाहेर काढले, आणि त्याचं धाबं दणाणालं.
रेड्डीने गावडेंना 1 कोटींची लाच देऊ केली. ज्याचा 25 लाखाचा पहिला हप्ता देताना रेड्डीला अँटी करप्शननं रंगेहाथ अटक केली. वाय शिवा रेड्डी मूळचा आंध्रप्रदेशचा आहे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यानं अक्षरश: पैसे उपसण्याचं मशीनच लावलं.
अँटी करप्शनच्या तपासात काय उघड ?
मुंबई आणि वसईत वाय.शिवा रेड्डीचे 4 कोटीचे 5 फ्लॅट
वसई बँकेच्या लॉकरमध्ये 2 किलो सोनं आणि 33 लाख रुपयाची रोकड
हैदराबादच्या घरातून पोलिसांनी 91 लाख रुपयाची रोकड जप्त केली
हैदराबाद शहरातील उच्चभ्रू वसाहतीत 10 फ्लॅट्स आणि 1 बंगलाही रेड्डीच्या नावावर
रेड्डीच्या घरातून भूखंड आणि इतर मालमत्ता असलेली कागदपत्रंही पोलिसांच्या ताब्यात
वाय.शिवा रेड्डी हा क्लास वन अधिकारी आहे. त्यानं आपल्या परदेशवाऱ्यांची माहिती सरकारला देणं बंधनकारक आहे. त्यावरही रेड्डीनं नवाच फंडा शोधून काढला.
रेड्डीसारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांनी 40 ते 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही शिवसेनेचे गटनेते गावडेंनी केला आहे.
याआधीही कल्याण डोंबिवलीत सुनील जोशी, नाशकातून सतीश चिखलीकर, रायगडचा उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर अशा अनेक अधिकाऱ्यांना अँटी करप्शनने गजाआड केलं. पण त्याचं पुढे काय होतं, हे कळत नाही. त्यामुळे सरकारने भ्रष्टाचाऱ्यांच्या केसेस फास्ट ट्रॅकवर निकाली काढल्या पाहिजेत. म्हणजे 'कुछ नहीं होता' अॅटीट्यूडला वेसण बसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement