एक्स्प्लोर

रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाकडून बहिणीची हत्या

बहीण मोबाईलवर जास्त वेळ बोलत असल्याच्या रागातून वसईत सख्ख्या भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केली.

वसई : रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन घेतलं, मात्र अवघ्या 24 तासात हाच भाऊ तिच्या जीवावर उठला. बहीण मोबाईलवर जास्त वेळ बोलत असल्याच्या रागातून सख्ख्या भावाने तिची गळा आवळून हत्या केली. मुंबईजवळच्या वसईत ही घटना उघडकीस आली आहे. वसईच्या वालीव हद्दीतील पाळणापाडामधील दुमंडा चाळीत बहीण-भावाच्या नात्याला रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी गालबोट लागलं. मयत तरुणीला चार ते पाच महिन्यांपूर्वी नवीन मोबाईल घेऊन देण्यात आला होता. त्यामुळे मोबाईलविषयी तिच्या मनात कुतूहल होतं. नव्या मित्रांसोबत ती फोनवर बराच वेळ गप्पा मारत असे. हत्येच्या दिवशी वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर आईसुद्धा घरी नव्हती. खाजगी कंपनीत कार्यरत असलेला मोठा भाऊ ऑफिसला गेला होता. हीच संधी साधत राहत्या घरी दुपारी ओढणीच्या सहाय्याने भावाने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून, आरोपी भावानेच पोलिसांना बोलावून घेतलं आणि हत्येची माहिती दिली. पोलिसांना सुरुवातीला कुटुंबातील व्यक्तींवर संशय नव्हता, मात्र तपासाची चक्रं फिरताच अल्पवयीन भाऊ समोर आला. अखेर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी भावाला ताब्यात घेतलं. अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : गेवराईचा आमदार हराXXX, चुXX, लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; मनोज जरांगेंवर टीका अन् आमदारकीला उभे राहण्याची तयारी
गेवराईचा आमदार हराXXX, चुXX, लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; मनोज जरांगेंवर टीका अन् आमदारकीला उभे राहण्याची तयारी
ST Employee Salary : मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार
Sadabhau Khot  : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : गेवराईचा आमदार हराXXX, चुXX, लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; मनोज जरांगेंवर टीका अन् आमदारकीला उभे राहण्याची तयारी
गेवराईचा आमदार हराXXX, चुXX, लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; मनोज जरांगेंवर टीका अन् आमदारकीला उभे राहण्याची तयारी
ST Employee Salary : मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार
Sadabhau Khot  : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
Narendra Modi Degree : नरेंद्र मोदींच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक होणार नाही, दिल्ली हायकोर्टानं केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय फिरवला
नरेंद्र मोदींच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक होणार नाही, दिल्ली हायकोर्टानं केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय बदलला
Sachin Tendulkar : 'आता आधार कार्ड पाठवू का?' व्हॉईस नोट पाठवा म्हणणाऱ्या यूजरची सचिन तेंडुलकरकडून एका वाक्यात विकेट
' आता आधार कार्ड पाठवू का?' सचिन तेंडुलकरच्या उत्तरानं यूजरची बोलती बंद, नेमकं काय घडलं?
Baban Taywade : सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
Embed widget