वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी
आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आरएसएसला घटनेच्या कक्षेत आणण्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत आहे. काही मुद्यांवर अजून चर्चा व्हायची आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा महाआघाडीत समावेश होण्यासंदर्भातील बैठक आज मुंबईत पार पडली. लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्या 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागांचा समावेश आहे.
आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आरएसएसला घटनेच्या कक्षेत आणण्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत आहे. काही मुद्यांवर अजून चर्चा व्हायची आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीकडून 22 जागांची मागणी
आरएसएसला घटनेच्या कक्षेत आणण्यासंदर्भात मसुदा काय असावा, यावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे, वंचित बहुजन आघाडीतर्फे बैठकीत आलेल्या लक्ष्मण माने यांनी मांडली.
नांदेड, बारामती आणि माढा या जागांचा समावेश
बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागांचा समावेश आहे. आमची मनापासून इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत यावे. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत, याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत.
मोदी लाटेतही बारामती, माढा, नांदेड जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील की जागांबाबत काय निर्णय घ्यायचा. सुप्रिया सुळे, पवार साहेब आणि अशोक चव्हाण यांना निर्णय घ्यावा लागेल की निवडणूक लढवायची की नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
संबंधित बातम्या
मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर
राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...