coronavirus | कोरोना व्हायरसवर लवकरच लस येणार; पुण्यात विषाणू शरीराबाहेर ठेवण्यात यश
कोरोना व्हायरस संदर्भात सर्वांना दिलासा देणारी बातमी आलीय. कोरोना विषाणूवर महत्वपूर्ण संशोधन करण्यात पुण्यातील NIV संस्थेला यश आल्याची माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलीय.
मुंबई : कोरोना विषाणू संदर्भात सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लवकरच कोरोनावर कुठलं औषध काम करेल, हे कळू शकतं अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आलं असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही गंगाखेडकर यांनी माझाला सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसवर लवकरच औषध येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, औषध कळालं की ते बनवायला वेळ लागेल असंही त्यांनी कबूल केलं.
कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून भारतातही त्याने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. याची गंभीर दखल सरकारने घेतली असून सर्वांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे. कारण, लवकरच कोरोनावर कुठलं औषध काम करेल, हे कळू शकणार आहे. पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी याविषयी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती दिली आहे. कोरोना हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर राहणे कठीण आहे. मात्र, पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संस्थेने हा विषाणू मानवी शरीराबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे, मानवी शरीरातील विषाणूंवर प्रयोग करणे धोकादायक आहे. हा विषाणू शरीराबाहेर असल्यानंतर तो विषाणूंची निर्मिती करतच असतो. परिणामी शरीराबाहेर विषाणूंवर कोणती लस काम करेल याचा शोध घेणे सोपं आहे. त्यामुळे लवकरच यावर लस शोधण्यात यश येईल, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.
coronavirus | कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम; सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ
असं संशोधन करणारा भारत जगातील पाचवा देश
चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत जवळपास पाच हजार लोकांचा बळी घेतला आहे. तर, सव्वालाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहेत. लस शोधण्यासाठी कोणताही विषाणू मानवी शरीराबाहेर असणं आवश्यक आहे. कारण, त्यामुळे विषाणूंवर वेगवेगळे प्रयोग करणे सोपं असतं. काही देशांना यात यश आलं आहे. भारत हा जगातील पाचव्य़ा क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आलं असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही गंगाखेडकर यांनी माझाला सांगितलं.
Coronavirus | कोरोना विषयी तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं