एक्स्प्लोर
यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
यूपीएस मदान याआधी वित्त विभागाचे सचिव होते. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
मुंबई : यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. डी के जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती झाल्याने मुख्य सचिव पदाची जागा रिक्त झाली होती. यूपीएस मदान याआधी वित्त विभागाचे सचिव होते. पुढील सहा महिने मदान मुख्य सचिवपदी राहतील, कारण सप्टेंबर महिन्यात ते सेवा निवृत्त होणार आहेत.
मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत यूपीएस मदान आणि मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र सेवा ज्येष्ठतेनुसार यूपीएस मदान यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
डी. के. जैन 31 जानेवारी रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. पिनाकी घोष यांची लोकपालपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकपालचे सदस्य म्हणून डी. के. जैन यांची निवड झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement