एक्स्प्लोर

देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी परवानगी देण्याची बीएमसीकडून हायकोर्टाला विनंती

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाले आहे. परंतु एकुण कचऱ्याचे आकारमान पाहता या कामास किमान सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो.

मुंबई : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर अधिक ताण पडू नये म्हणून तिथला किमान 450 मेट्रिक टन कचरा देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकू देण्याची मागणी मुंबई महापालिकेच्यावतीने हायकोर्टाकडे करण्यात आली आहे. यावर देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुमारे 450 मेट्रिक टन कचरा जमा करण्यासाठी किती जागा लागेल? असा सवाल हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला केला आहे. कारण 450 मेट्रिक टन कचरा टाकण्यासाठी तब्बल 120 एकरची जागा कशाला हवी? असा प्रश्‍न याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात उपस्थित केला आहे. त्यावर हायकोर्टानं याबाबतचा तपशील नकाशाच्या आधारे सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असून यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. मुंबई शहर-उपनगरांमधील ओला-सुका कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडवर जमा करण्यात येतो. मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्याचे काम महापालिकेने पूर्णपणे बंद केले आहे. मात्र सध्या या भागामध्ये सुमारे 72 लाख मेट्रिक टन कचरा जमा झालेला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाले आहे. परंतु एकूण कचऱ्याचे आकारमान पाहता या कामास किमान सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकिल अनिल साखरे यांनी हायकोर्टाला दिली. मुंबईतील डंपिंग ग्राऊंडच्यासंदर्भात पांडुरंग पाटील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. पालिकेला मुंबईसाठी नवं डंपिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावात जमिन मिळाली आहे. मात्र अद्याप राज्य सरकारकडून या जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रियाच सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget