एक्स्प्लोर

मराठा आरक्षण संदर्भातील सर्व्हे करताना संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिलं : राज्य सरकार

राज्य सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच राज्य मागास आयोगातील सदस्यांची नेमणूक केली आहे. गायकवाड समितीच्या अहवालात कोणत्याही चुका नाहीत. गायकवाड समितीनं गोळा केलेली माहीती ही शास्त्रोक्त पद्धतीनं योग्यच असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेताना आम्ही निवडणुकांतील 'एक्झिट पोल'प्रमाणे सर्व्हेतून आलेल्या शास्त्रोक्त अनुमानांचा आधार घेतला. कारण शेवटी संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असतं अशी माहिती सोमवारी राज्य सरकारनं हायकोर्टापुढे मांडली.

राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालावर आणि राज्य सरकारनं त्यानुसार घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकारच्यावतीनं युक्तिवादाला सुरुवात झाली. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुरु असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अनिल साखरे हे सध्या राज्य सरकारची बाजू मांडत आहेत.

राज्य सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच राज्य मागास आयोगातील सदस्यांची नेमणूक केली आहे. गायकवाड समितीच्या अहवालात कोणत्याही चुका नाहीत. गायकवाड समितीनं गोळा केलेली माहिती ही शास्त्रोक्त पद्धतीनं योग्यच असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

मराठा आरक्षणाबाबत डेटा गोळा करण्याचा जबाबदारी या कामात पारंगत असलेल्या पाच स्वतंत्र संस्थांना दिली गेली होती. राज्यातील 28 जिल्हे आणि 5 तालुक्यांत जाऊन संस्थांनी आयोगासाठी माहिती गोळा केली. केवळ गडचिरोली आणि आसपासच्या चार आदिवासी जिल्ह्यांचा विचार झाला नाही, कारण तिथं मराठा समाजच अस्तित्त्वात नाही.

त्याचबरोबर मुंबई सारख्या महानगराला या सर्व्हेतून वगळण्यात आल्याचा विरोधकांचा दावा चुकीचा असल्याचं सांगत मुंबईत यासंदर्भात जनसुनावणी घेण्यात आली होती, अशी माहिती अॅड. साखरे यांनी हायकोर्टात दिली.

मुंबईसह इतर 6 शहरांत लोकांच्या दारोदारी जाऊन हा सर्व्हे करण्यात आला असून राज्यभरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकूण 21 जनसुनावण्या घेण्यात आल्या अशी माहिती कोर्टापुढे ठेवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Maharashtra Weather Updates: समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget