एक्स्प्लोर

मंजुळा शेट्ये मृत्यूशी आपला काही संबंध नाही, स्वाती साठेंचं कोर्टात स्पष्टीकरण

स्वाती साठेंनी दाखल केलेल्या तीन पानी उत्तरात त्यांनी स्पष्ट केलं की, भायखळा जेलमधील या संपूर्ण प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.

मुंबई : भायखळा महिला जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हीच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा स्वाती साठे यांनी कोर्टात सादर केलेल्या उत्तरात दिला आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी डीआयजी - कारागृह स्वाती साठे, जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने, भायखळा जेलचे सुप्रिटेडंट चंद्रमणी इंदुलकर हे किला कोर्टात हजर होते. डॉ. लहाने आणि इंदुलकर यांना उत्तर देण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भायखळा जेलमध्ये 23 जून रोजी वॉर्डन मंजुळा शेट्ये हिच्या हत्येसंदर्भात याच जेलमधील कैदी मरियम शेख हिनं अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल करून वरील संबंधितांवर गंभीर आरोप केले आहेत. स्वाती साठेंनी दाखल केलेल्या तीन पानी उत्तरात त्यांनी स्पष्ट केलं की, भायखळा जेलमधील या संपूर्ण प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कारागृह प्रशासनाच्या पश्चिम विभागाशी संबंधित असल्यानं त्यांचा दक्षिण विभागात मोडणाऱ्या भायखळा जेलच्या कारभाराशी सध्या काही संबंध नाही. जेजेचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना आपण ओळखत नाही, तसेच त्यांच्याशी कधीही फोनवर बोलण झालं नाही, असा दावा स्वाती साठेंनी केला आहे. आपल्याकडे एकच मोबाईल नंबर असून माध्यमातून येणाऱ्या उलटसुलट बातम्याही खोट्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच एक जबाबदार अधिकारी या नात्यानं आपण तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचंही स्वाती साठेंनी कबूल केलं आहे. मरियम शेखनं केलेल्या आरोपांनुसार, सदर घटनेनंतर स्वाती साठेंनी भायखळा जेलमधील मंजुळाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यात आणि डॉ. लहानेंशी सातत्यानं संपर्कात राहून दोषींना वाचवण्यात मोलाची भुमिका बजावली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सुरुवातीला ही घटना एक अपघात असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनी माध्यमांच्या दबावानंतर क्राईम ब्रांचकडे सोपवला. या प्रकरणी भायखळा जेलच्या जेलक मनिषा पोखरकर यांच्यासह 6 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget