एक्स्प्लोर

जावेद अख्तर प्रकरणी कंगना रणौतला योग्य कोर्टापुढे दाद मागण्याचे निर्देश तर कंगनाच्या पासपोर्ट प्रकरणी जावेद अख्तर यांच्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भात कंगानानं हायकोर्टात दाखल केलेल्या अर्जाविरोधात जावेद अख्तर यांच्या हस्तक्षेप अर्जावर बाजू ऐकण्यास कोर्टानं नकार दिला.

मुंबई : कंगना रणौतला तातडीच दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कंगानाने केली होती. मात्र, न्यायालयाने तिची बाजू ऐकण्यास नकार देत योग्य कोर्टापुढे दाद मागण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे, पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भात कंगानानं हायकोर्टात दाखल केलेल्या अर्जाविरोधात जावेद अख्तर यांच्या हस्तक्षेप अर्जावर बाजू ऐकण्यास कोर्टानं नकार दिला. या प्रकरणात तुमचा हस्तक्षेप अर्ज दाखल करून घेतल्यास इतरही शंभर अर्ज दाखल होतील. त्यामुळे आम्ही प्रत्येकाची बाजू ऐकण्यास बांधिल नाही, तुम्ही पासपोर्ट प्राधिकरण अथवा राज्य सरकारकडे आपली तक्रार नोंदवू शकता असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठानं कंगनाच्या पासपोर्ट प्रकरणात जावेद अख्तर यांची बाजू एकण्यास नकार देत सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.  

कंगनानं तिच्याविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही अँड. रिझवान सिद्दीकीमार्फत आव्हान दिले आहे. तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना या तक्रारींबाबत चौकशीचे निर्देश देण्याऐवजी, तक्रारदार अख्तर आणि साक्षीदारांच्या साक्षींची आधी पडताळणी करणं आवश्यक होतं. तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी उघडपणे पोलीस यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीररित्या साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याचा आरोप कंगनानं या याचिकेतून केला आहे. यामुळे आरोपींच्या अधिकारांचे रक्षण करण्यास दंडाधिकारी अपयशी ठरले असून आरोपींच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर गदा आल्यासारखे असल्याचा दावाही याचिकेत आहे. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी जमा केलेले साक्षीदारांचे जबाब हे बेकायदेशीर असल्याचे जाहीर करून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईवर स्थगिती द्यावी अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार या याचिकेवर एकलपीठासमोर (सिंगल बेंच) सुनावणी होणे अपेक्षित असल्याचं जावेद अख्तर यांच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या अँड. वृंदा ग्रोव्हर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं कंगनाला योग्य न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिलेत.

जावेद अख्तर यांची बाजू ऐकण्यास नकार

परदेशात चित्रपटाच्या चित्रीकरणास जाणासाठी पासपोर्ट नूतनीकरण करण्यात यावा यासाठी कंगनाने याचिका केली आहे. तेव्हा, आपल्याविरोधात एकही फौजदारी खटला प्रलंबित  नाही, असे विधान कंगनाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र हे विधान खोटं आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे असून अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यासाठी न्यायालयाकडून कंगनाला अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती दडवून ठेवली, असा आरोप यावेळी अँड. वृंदा ग्रोव्हर यांनी केला होता.

मात्र, न्यायालयाने तिची बाजू ऐकण्यास नकार देत योग्य कोर्टापुढे दाद मागण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे, पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भात कंगानानं हायकोर्टात दाखल केलेल्या अर्जाविरोधात जावेद अख्तर यांच्या हस्तक्षेप अर्जावर बाजू ऐकण्यास कोर्टानं नकार दिला. या प्रकरणात तुमचा हस्तक्षेप अर्ज दाखल करून घेतल्यास इतरही शंभर अर्ज दाखल होतील. त्यामुळे आम्ही प्रत्येकाची बाजू ऐकण्यास बांधिल नाही, तुम्ही पासपोर्ट प्राधिकरण अथवा राज्य सरकारकडे आपली तक्रार नोंदवू शकता असे स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget