एक्स्प्लोर

राज्य शासनाने लोककलावंतांना 10 हजाराची मदत द्यावी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

कोरोनाचा कहर वाढत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना  मागील वर्षांपासून कोणतेही कार्यक्रम मिळत नसल्याने त्यांचा  रोजगार बुडाला आहे. त्यांना सर्वांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

मुंबई : आंबेडकरी गायक, भीम शाहीर, भारुड, तमाशा कलावंत आदी लोककलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. आज  महाराष्ट्राच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. तसेच जागतिक कामगार दिन कामगारांना प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना 8 तासांचा दिवस आणि साप्ताहिक सुट्टी सारखे अनेक न्याय देणारे निर्णय घेतले. याचे स्मरण करत महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत आज रामदास आठवले यांनी  राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना प्रत्येकी रुपये 5 हजाराची आर्थिक मदत केली. रामदास आठवले यांचे 1 महिन्याचे  वेतन 2 लाख रुपये असून त्यातून 40 गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची आर्थिक मदत रामदास आठवले यांनी केली. 

कोरोनाचा कहर वाढत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना  मागील वर्षांपासून कोणतेही कार्यक्रम मिळत नसल्याने त्यांचा  रोजगार बुडाला आहे. कलावंतांची आर्थिक स्थिती हालाकीची झाली आहे. त्यांना सर्वांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली पाहिजे. आंबेडकरी कलावंत आणि तमाशा लोककलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे. माझ्या तर्फे आंबेडकरी कलावंतांना आज पहिल्या टप्प्यात 40 कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत आज  दिली असून लवकरच तमाशा कलावंतांना रिपाइं तर्फे मदत करण्यात येईल तसेच राज्यातील विभाग निहाय कलावंतांना आर्थिक मदत लवकर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं रामदास आठवले यांनी आज म्हटलं.

आज बांद्रा पूर्व येथील संविधान निवासस्थानी आंबेडकरी गायक कलावंत अशोक निकाळजे, मैनाताई कोकाटे, वैशालीताई शिंदे, छायाताई मोरे, चंद्रकला गायकवाड, मुकुंद ओव्हाळ, गौरी जाधव यांना रामदास आठवले आणि सीमाताई रामदास आठवले यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. अन्य कलावंतांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवण्यात येणार आहे. त्यात लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर, प्रताप सिंह बोदडे, कडुबई खरात आदी 33 गायक कलावंतांचा समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Dharashiv ZP Election: जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Embed widget