एक्स्प्लोर

उल्हासनगर महापौर निवडीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर आलेली असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्या 'साई' पक्षाच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्या साई पक्षाची आपल्याकडे नोंदच नसल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला लेखी स्वरुपात कळवलं आहे. पाच एप्रिलला उल्हासनगरच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत साई पक्षाचे सदस्य मतदानाच्या प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा शिवसेनेला होणार असून भाजपचं महापौरपदाचं स्वप्न धुळीला मिळण्याची चिन्हं आहेत. राज्यातील 10 महापालिका निवडणुकांपैकी उल्हासनगर ही महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखली जाते. मागील 15 वर्षांपासून सातत्याने शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या या महापालिकेत यंदा मात्र भाजप टीम ओमी कलानीच्या साथीने 32 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला. मात्र अपक्षांच्या साथीनेही 39 ही मॅजिक फिगर भाजपला गाठता येत नसल्यानं त्यांनी 12 जागा निवडून आणणाऱ्या साई पक्षाला सोबत घेतलं. उपमहापौरपद साई पक्षाला देण्याच्या बोलीवर भाजपने महापौरपदावर दावा केला. मात्र साई पक्षाने गटस्थापनेच्या केलेल्या दाव्यात पक्षाची घटनाच जोडलेली नसल्याचा आरोप 25 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. शिवसेनेच्या या पत्रानंतर कोकण आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला एक पत्र पाठवलं असून यात कायदेशीर गटनोंदणी आणि अधिकृतरित्या महापालिका पक्ष म्हणून नोंदणी केलेल्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीही जोडण्यात आली आहे. या पत्रात साई पक्षाची मात्र आपल्याकडे नोंदणी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून त्यांच्या नोंदणी नसलेल्या 12 नगरसेवकांची स्वतंत्र यादी जोडण्यात आली आहे. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी मात्र आपला पक्ष अधिकृत असल्याचं सांगितलं आहे. कोकण आयुक्तांच्या या पत्रामुळे तूर्तास हे सर्व नगरसेवक अपक्ष ठरले आहेत. या सर्वच्या सर्व नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ शकतो, किंवा पक्ष म्हणून नव्हे, तर अपक्ष म्हणून मतदान करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. यापैकी काहीही झालं, तरी फायदा मात्र शिवसेनेचाच होणार आहे. त्यामुळे आता बुधवारी पाच तारखेला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget