Ulhasnagar Municipal: उल्हासनगर महापालिकेत शिंदे ठरले मोठा भाऊ; सत्तास्थापनेसाठी वंचितचे दोन मोहरे लावले गळाला; उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र
Ulhasnagar Municipal: वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे. ७८ जागांच्या सभागृहात स्पष्ट बहुमत कोणाकडेच नसल्याने, सत्तेसाठी 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू झाली होती. या सत्तानाट्यात आता वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी किंगमेकरची भूमिका घेतल्याने चित्र स्पष्ट झालं आहे. उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.(Ulhasnagar Municipal Corporation)
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.(Ulhasnagar Municipal Corporation)
उल्हासनगर महापालिकेमध्ये एकूण ७८ जागा आहेत. तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सत्तास्थापनेसाठी ४० हा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजपकडे-३७ तर शिंदेसेनेचे ३६ जागा निवडून आल्या आहेत. साई पक्षाच्या दीप्ती दुधानी व अपक्ष सविता तोरणे-रगडे हे शिंदेसेना महागठबंधन मधील नगरसेवक आहेत, त्यामुळे शिंदेसेना महागठबंधनचा आकडा ३६ वरून ३८ वर गेला होता. मात्र सत्तेसाठी त्यांना २ नगरसेवकाची गरज होती. वंचित बहुजन आघाडीकडे २ नगरसेवक होते, त्यांनी वंचित उमेदवारांना आमिष दाखविल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता वंचितचे विकास खरात व सुरेखा सोनावणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची एकूण सदस्य संख्या ४० वर जात आहे. आता उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना आपला स्पष्ट बहुमत सिध्द करू शकते.
निकालानंतर वंचितचे नगरसेवक होते नॉट रिचेबल
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सोनू पवार यांनी खळबळजनक दावा केला होता की, भाजप आणि शिंदे सेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेसाठी विविध प्रलोभनं आणि आमिषं दाखवली जात असल्याच्या भीतीपोटी पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांना अज्ञातस्थळी पाठवले आहे. भविष्यात कोणताही दगाफटका होऊ नये आणि पक्षाची निष्ठा जपली जावी, यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशाने नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी कबुली सोनू पवार यांनी दिली होती, त्यानंतर आता या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
Before You Go
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना






















