एक्स्प्लोर

अनिल अंबानींना आणखी एक झटका, तीन चिनी बँकांचे 5000 कोटी रुपये 21 दिवसात फेडण्याचे आदेश

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 21 दिवसात तीन चिनी कंपन्यांचे 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम फेडण्याचे आदेश लंडनमधील कोर्टाने दिले आहेत.

मुंबई : कर्जात बुडालेले रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वैयक्तिक हमीच्या एका प्रकरणात लंडनच्या एका कोर्टाने अनिल अंबानी यांना तीन चिनी बँकांचे 717 मिलियन डॉलर (जवळपास 5000 कोटी रुपये ) 21 दिवसांच्या फेडण्याचे आदेश दिले आहेत.

आरकॉमच्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित प्रकरण हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाचे न्यायमूर्ती नीगेल टीयरे म्हणाले की, "या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिकरित्या हमी दिली आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम फेडावीच लागेल. तर दुसरीकडे "हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) 2012 मध्ये घेतलेल्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित आहे. पण या कर्जासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली नव्हती," असा दावा अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

या बँकांना पैसे द्यायचे आहेत! इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, (आयसीबीसी) मुंबई शाखा चायना डेव्हलपमेंट बैंक एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना

फेब्रुवारीत 100 मिलियन डॉलर जमा करण्याचा आदेश लंडनच्या कोर्टाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांना 100 मिलियन डॉलर एवढी रक्कम सहा आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. तेव्हा अनिल अंबानी यांनी कोर्टात सांगितलं होतं की, "सध्या माझं नेटवर्थ शून्य झालं आहे आणि कुटुंब मदत करत नाही. त्यामुळे मी 100 मिलियन डॉलर फेडण्यास सक्षम नाही."

दिवाळखोरीत आरकॉम आरकॉमवर सुमारे 46 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. लंडन कोर्टाच्याआदेशानुसार, वैयक्तिक हमीच्या अंतिम रकमेचं आकलन आरकॉमच्या रिझॉल्यूशन प्लानच्या आधारावर होईल, असं अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. "एकदा रिझॉल्यूशनची प्रक्रिया पूर्ण झाली की आदेशात सांगितलेली रक्कम फेडली जाईल. आरकॉमच्या कर्जदात्यांनी मंजूर केलेल्या रिझॉल्यूशन प्लॅननुसार ही कथित वैयक्तिक हमीची रक्कम सुमारे 50 टक्के कमी होईल," असंही प्रवक्ते म्हणाले.

दरम्यान आम्ही लंडनमधल्या कोर्टाच्या निर्णयाबाबत कायदेशीर पर्यायांवर विचार करत असल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget