Milind Narvekar Net Worth : बीड-दापोलीत शेतजमीन, सोनं-नाणं, मुंबईत घर; उद्धव ठाकरेंचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकरांच्या तिजोरीत संपत्ती किती?
Milind Narvekar Net Worth : मिलिंद नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. नार्वेकर यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 एवढी रक्कम आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं नाव समोर आलं की नकळत मिलिंद नार्वेकर (Milind Narvkar) यांचंही नाव ओघाने येतंच. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून तीन दशकांपासून काम पाहत आहेत. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर नार्वेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे. नार्वेकर यांच्या नावावर कोट्यवधीची संपत्ती तर नार्वेकरांच्या पत्नीच्या नावे 11 कोटी 74 लांखांची संपत्ती आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहाय्यकावर एकही गुन्हा दाखल नाही.
मिलिंद नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. नार्वेकर यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 एवढी रक्कम आहे. नार्वेकर यांच्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये विविध बँकांमधील ठेवी आणि शेअर्समधील गुंतवणुकीचा समावेश आहे.बॉण्ड्स किंवा म्युचल फंड मध्ये 50 हजार, तर पत्नीची 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीची 67 लाख 88 हजार 558 गुंतवणूक आहे.
नार्वेकरांवर कर्ज किती? (Milind Narvekar Loan)
- वैयक्तिक कर्ज - 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज
- बँक लोन - स्वतःवर 1 कोटी 54 लाख 81 हजार 989, पत्नीवर कर्ज 38 लाख 94 हजार 807 रुपये
नार्वेकरांकडे दागिने किती? (Milind Narvekar jewellery)
स्वत: नार्वेकरांकडे एकूण 71 लाख 28 हजार 189 रुपयांचे दागिने आहेत.
- सोनं - 355.94 ग्राम, बाजारी भाव - 24 लाख 67 हजार 981
- चांदी - 12.56 किलोग्राम, बाजारी भाव - 9 लाख 74 हजार 656
- हिरे - 80.93, बाजारी भाव - 36 लाख 85 हजार 552
नार्वेकरांच्या पत्नीकडील दागिने
नार्वेकरांच्या पत्नीकडे 67 लाख 61 हजार 420 रुपयांचे दागिने आहेत.
- सोनं - 425 ग्राम, 29 लाख 26 हजार 21 रुपये
- चांदी - 6.26 किलो, 4 लाख 85 हजार 776
- हिरे - 90.96, 33 लाख 49 हजार 623
नार्वेकरांची शेअर्समधील गुंतवणूक (Narvekar Shares)
श्री बालाजी कॉम. एलएलपी 50 टक्के शेयर्स तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स
मिलिंद नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एसीयन पेंट्स, IDBI बँक, ICCI बँक आणि इतर कंपन्यामध्ये शेयर्स खरेदी केले.
जमीन (Narvekar Land)
16 जुलै 2013 रोजी गांव मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे 74.80 एकर जमीन यामध्ये पत्नीचा 50 टक्के हिस्सा
शेतजमीन - 5 ऑगस्ट 2008 रोजी खरेदी केलेली बीड जिल्ह्यातील बाणेवाडी गावात 0.19 एकर जमीन, बेंगलोर येथे पत्नीच्या नावावर 2325 स्क्वेअर फुट जमीन
संपत्ती (Narvekar Property)
मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचे घर नावावर, पत्नीच्या नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस नावावर आहे.
स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम - 4 कोटी 17 लाख 63, हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची रक्कम - 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे.
मिलिंद नार्वेकर आणि पत्नीचे उत्पनाचे साधन (Narvekar Income Source)
वैयक्तिक पगार, घरांचे भाडे, व्यावसायिक इन्कम
हे ही वाचा :























