एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीने मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा; उद्धव ठाकरेंच्या सूचना

Uddhav Thackeray BMC Meeting : मुंबई महापालिका निवडणूक कधीही होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक प्रभागाची चाचपणी करून त्याचा अहवाल सादर करा असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. 

मुंबई : भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे तात्काळ कामाला लागा अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सेनेच्या माजी नगरसेवकांना सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर शिवसेनेने लढवावी असा सूर बहुतांश माजी नगरसेवकांकडून उमटल्याची माहिती आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा

शिवसेनेकडून  हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने  मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य ते उत्तर द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे. 

भाजप पक्षाची बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागळात जाऊन काम केलं  पाहिजे असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं. महापालिका निवडणुकीसाठी 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करण्याचे आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्याच्या घडीला जवळपास 64 नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत असल्याची माहिती आहे. 

उद्धव ठाकरे नेमके बैठकीत काय म्हणाले?

पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करतील. RSS चा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे." 

उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर घेण्यात येणार आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad : CID च्या लिफ्टमध्ये जाताच मीडियासमोर हात जोडलेSuresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री कराWalmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
Embed widget