एक्स्प्लोर
मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचं सूचक मौन स्नेहभोजनाला दांडी मारण्याचे संकेत दर्शवत आहे.
जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे नामकरण पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला, मात्र एनडीएच्या बैठकीला दिल्लीला जाणार का? या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली.
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंच्या या सूचक इशाऱ्यातून ते मोदींच्या स्नेहभोजनाला जाणार नाही अशीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना-भाजपतील वाद आणि आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबत शिवसेनेची भूमिका यावर मोदी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची शक्यता आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement