एक्स्प्लोर

वांद्रे-वरळी सी लिंकवर स्टंट करणाऱ्या दोन रशियन नागरिकांना अटक

मुंबई पोलिसांनी घातपातच्या अनुषंगाने चौकशी केली असता तसे काहीच संशयास्पद आढळले नाही. दोघेही सर्कसमधील कलाकार असून भारतामध्ये काम मिळेल त्या राज्यात फिरत असल्याचे समजले. मुंबईत असल्याने ते वांद्रे-वरळी सी लिंकवर आले होते.

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी स्टंट करण्यासाठी गेलेल्या दोन रशियन नागरिकांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांपैकी एकजण पुलावरील स्टील केबलच्या साहाय्याने पायलॉन टॉवरवर चढला होता. तर दुसरा त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढत होता. वांद्रे-वरळी सी लिंकवर अशाप्रकारे विनापरवाना कृत्य केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले दोघेही रशियन सर्कसमध्ये काम करणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वर्षभरापूर्वी टुरिस्ट व्हिसावर आलेल्या मकसिम सचेरबकोव्ह (24) आणि वासिली कोलेसेनिकोव्ह (30) यांनी बुधवारी वांद्रे येथे टॅक्सी पडकली आणि ते वरळीच्या दिशेने आले. सागरी सेतूच्या मध्यभागी येताच त्यांनी टॅक्सी थांबवण्यास सांगितली. दोघेही टॅक्सीतून खाली उतरले आणि पायलॉन टॉवरच्या जवळ गेले. यातील एकजण स्टील केबलच्या साहाय्याने वर चढत होता, तर दुसरा पुलावरून त्याचे फोटो काढत होता. 

याचदरम्यान सी लिंकवरून जाणाऱ्या एक नागरिकाने याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच वरळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मकसिम आणि वासिली या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. 

पोलिसांनी घातपातच्या अनुषंगाने चौकशी केली असता तसे काहीच संशयास्पद आढळले नाही. दोघेही सर्कसमधील कलाकार असून भारतामध्ये काम मिळेल त्या राज्यात फिरत असल्याचे समजले. वांद्रे येथील एका स्टुडिओमध्ये त्यांना काम मिळाले होते, यासाठी ते मुंबईत आले होते. उंच ठिकाणी, इमारती यांच्यावर जाऊन स्टंट करणे आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे हा दोघांचा छंद असल्याचे त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट तपासल्यानंतर लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
Embed widget