एक्स्प्लोर
अंधेरीत 22 मजली इमारतीला आग, दोघांचा मृत्यू
छट पूजा सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 10 व्या आणि 11 व्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढलं.
मुंबई : अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील 22 मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. कदम नगरमधील एसआरएच्या ट्रान्सकॉन इमारतीच्या 10व्या आणि 11व्या मजल्यावर ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
या आगीमध्ये सात वर्षीय सागर शैलेश शर्मा आणि 25 वर्षीय विकी लालकृष्ण शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. तर 56 वर्षीय लाल किशोर शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत.
छट पूजा सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 10 व्या आणि 11 व्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढलं.
धुरामुळे गुदमरल्याने तिघांची प्रकृती गंभीर बनली होती. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement