एक्स्प्लोर
अभिनेत्रीच्या कारवर भर रस्त्यात लाथा मारल्या
याबाबत अभिनेत्री सुशीलने अंधेरीतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुंबई: हुल्लडबाज दुचाकीस्वाराचा फटका एका अभिनेत्रीला बसला. चारचाकी गाडीमुळे खड्ड्यातील पाणी अंगावर उडल्याच्या रागातून, दुचाकीस्वाराने अभिनेत्री आणि होस्ट असलेल्या सुशील जांगिराच्या गाडीवर लाथा मारल्या. इतकंच नाही तर तिला शिव्या देऊन गाडीचा आरसाही तोडला.
याबाबत अभिनेत्री सुशीलने अंधेरीतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुशील जांगिरा शनिवारी आपल्या गाडीतून जात होती. त्यावेळी 22 ते 25 वयोगटातील तरुण येऊन तो भररस्त्यात अभिनेत्रीच्या गाडीवर लाथा मारु लागला. अंधेरीतील लोखंडवालासारख्या पॉश आणि हायप्रोफाईल भागात ही घटना घडली.
चारचाकीमुळे खड्ड्यातील पाणी दुचाकीवर उडाल्यामुळे त्याने थेट गाडीवर लाथा मारण्यास सुरुवात केली. सुशील त्याला नेमकं काय झालंय विचारु लागली, पण तो आणखीनच ओरडून शिव्या देऊ लागला.
शेवटी सुशील यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचे बंद केल्यानंतर त्याने साईडचा आरसा तोडला आणि फरार झाला. यानंतर पोलिस तिथे आले. मात्र हे सर्व घडत असताना तिथे उभ्या असलेल्या कोणीही सुशीलच्या मदतीला धावलं नाही. हा सर्व प्रकार अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुशील एक टीव्ही चॅनेलची अँकर आणि अभिनेत्री आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद अंबाला पोलिसात झाली आहे. पोलिस आता सीसीटीव्हीच्या आधारे या युवकाचा शोध घेत आहेत.
I’m shocked & shaken over what has happened with me yesterday afternoon. What is our Mumbai police doing to take care of these safety hazards in a women’s day to day life? I deserve to live safely??? @MumbaiPolice @HMOIndia @PMOIndia pic.twitter.com/zi7B11ksGJ
— Susheel Jangira (@SusheelJangira) August 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
कोल्हापूर
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
