एक्स्प्लोर
Advertisement
कोणाला किती हफ्ता?, ट्रॅफिक पोलिसांचं रेटकार्ड हवालदाराकडून कोर्टात सादर
मुंबई : मुंबई वाहतूक पोलिस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचं रेटकार्ड ठरलेलं आहे, असा सनसनाटी गौप्यस्फोट पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात केला आहे.
भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होतो, असंही त्यांनी सांगितलं. सुनील टोके यांनी व्हिडीओ पुराव्यांसह याचिका हायकोर्टात सादर केली आहे.
पोलिस सेवेत असलेल्या हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत टोके यांनी वाहतूक विभागात सध्या सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दाद मागितली आहे.
यासंदर्भात वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे अखेरीस टोके यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. त्यांनी हायकोर्टासमोर सादर केलेली माहिती आणि आरोप हे फार गंभीर आहेत. या याचिकेवर 23 जानेवारी रोजी सुनावणी होण अपेक्षित आहे.
वाहतूक विभागावरील आरोप
- प्रत्येक वाहतूक विभागात दोन हवालदारांची हफ्ता वसुलीसाठी नियुक्ती केली जाते
- बड्या हॉटेल्सकडून, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगसाठी दरमहा 40 ते 50 हजार रुपयांचा हफ्ता
- कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्ते खोदकामाच्या कामासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये महिना हफ्ता
- टीव्ही सीरियल, सिनेमा शूटिंग आणि मोठ्या जाहिरातींचं शूटिंग करणाऱ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपयांचा हफ्ता
- एक्झिबिशन सेंटर, नेस्को, बीकेसी इथल्या मोठ्या आयोजनादरम्यान एका कार्यक्रमाला 1 लाख रुपयांचा हफ्ता
- ड्रिंक अँड ड्राइव प्रकरणात 5 ते 10 केसेसचं टार्गेट असतानाही 40 ते 50 केसेस घेतल्या जातात. मात्र कागदोपत्री केवळ 5 ते 10 केसेस दाखवल्या जातात.
- पकडलेल्यांची आर्थिक क्षमता ओळखून त्यांच्याकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले जातात
- मुंबईत बेकायदेशीररित्या धंदा करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून दरमहा 1000 ते 2 हजार रुपयांचा हफ्ता घेतला जातो
- प्रत्येक डॉमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटची डिलीवरी करणाऱ्या विक्रोत्यांकडून दरमहा 20 ते 25 हजार रुपयांचा हफ्ता
- प्रत्येक टू-व्हिलर शोरुम कडून 5 हजार तर फोर-व्हिलर शोरुम कडून 10 हजारांचा हफ्ता
- प्रत्येक टँकरकडून दिवसाला 100 ते 200 रुपये
- सिमेंट मिक्सर, रेती, विटांचा वापर करणाऱ्या बांधाकाम साईट्सवरुन 25 ते 30 हजार रुपये महिना हफ्ता आकारला जातो
- बेकायदेशीररित्या ओव्हरलोडिंग करणाऱ्या प्रत्येक ट्रककडून दिवसाला 3 ते 4 हजार रुपये हफ्ता
- शाळकरी मुलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅन्सकडून दरमहा 1000 ते 2000 रुपये हफ्ता
- ऑक्ट्राय चुकवून येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून 4 ते 5 हजार रुपये हफ्ता
- बेकायदेशीर पार्किंगमधून वाहन टोईंग करण्याचे कंत्राट हे खाजगी कंपन्यांना दिलेलं आहे. ताबडतोब गाड्या सोडल्या की त्यांच्याकडून जी रक्कम आकारली जाते, त्यातील 20 रुपये त्या गाडीवरील हवालदाराला आणि उर्वरित रक्कम त्या ट्रॅफिक चौकीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला मिळते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement