एक्स्प्लोर
वाशी, खारघर टोलनाक्याजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

नवी मुंबई: सुट्टी संपवून परतणाऱ्यां पर्यटकांमुळे मुंबईच्या एन्ट्री पॉईन्टला मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळीच वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाशीसोबतच खारघर टोलनाक्यावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे. गणपतीचे दिवस आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी मुंबईबाहेर जाणं पसंत केलं होतं. त्याच सुट्ट्या संपवून अनेक जण आज मुंबईत परतत आहे. त्यामुळे नवी मुंबईजवळ वाहतुकीची कोंडी झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























