एक्स्प्लोर
मुंबईत 2018 मध्ये तब्बल 10068 आपत्कालीन दुर्घटना, 153 लोकांचा बळी
1 जानेवारी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 10068 आपत्कालीन दुर्घटना मुंबईत घडल्या आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 2018 मध्ये तब्बल 10068 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये 153 लोकांचा बळी गेला आहे तर 599 जण जखमी झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकारात मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला 2018 मध्ये मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे, तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहिती अधिकारी रश्मी लोखंडे यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकारात ही धक्कादायक आकडेवारी दिली आहे.
1 जानेवारी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 10068 आपत्कालीन दुर्घटना मुंबईत घडल्या आहे. या सर्व दुर्घटनांमध्ये एकूण 153 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 116 पुरुष आणि 37 स्त्रियांचा समावेश आहे. तसंच एकूण 599 लोक या दुर्घटनांमध्ये जखमी झाले आहेत. ज्यात 383 पुरुष आणि 216 स्त्रियांचा समावेश आहे.
आपत्कालीन दुर्घटनांची माहिती
मुंबईत एकूण 3169 झाडे पडण्याची घटना घडल्या आहेत. ज्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. तर 71 दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 2018 मध्ये 2704 घर किंवा इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या ज्यात 234 लोकांचा मृत्यू झाला. सोबतच तब्बल 20074 आग किंवा शोर्टसर्किटच्या दुर्घटना घडल्या ज्यात 208 लोकांचा मृत्यू झाला.
गॅसगळतीच्या 1291 घटनांमध्ये एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement