एक्स्प्लोर

..म्हणून मुंबई विमानतळावर एन्ट्रीसाठीही 130 रुपये टोलवसुली!

मुंबई : तुम्ही जर मुंबई विमानतळावरुन प्रवास करत असाल, तर खिशाला चाट बसल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. मुंबईच्या एंट्री पॉईंट्स प्रमाणेच आता मुंबई विमानतळाच्या एंट्री पॉइंटवरही तुम्हाला टोल भरावा लागतो. मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एंट्री फीच्या नावाखाली 130 रुपये वसूल केले जातात. त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही. आत शिरताच तुमच्यावर टोलसक्ती लागू होते. 'एबीपी माझा'ची टीम T2 टर्मिनलला पोहचताच तिथल्या खाजगी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या वाहनाला घेरलं. त्यावेळी घडलेलं संभाषण पुढीलप्रमाणे - प्रतिनिधी : किस चीज का टोल? पार्किंग थोडी किया है? ये तो सिर्फ पीक अप पॉईंट है? टोल कर्मचारी : पीक अप का भी पैसा भरना पडता है। 130 रुपया। प्रतिनिधी : एंट्री चार्ज भरना पडता है ऐसा तुम्हारे अॅग्रिमेन्ट में नही लिखा है। सिर्फ पार्किंग का पैसा देने का नियम है। अॅग्रिमेन्ट दिखाओ या फिर अपने कॉन्ट्रॅक्टर को बुलाओ। कर्मचारी : अॅग्रिमेन्ट आप जाके देखलो। पैसा तो देना पडेगा..। हा गोंधळ सुरु असताना आणखी काही प्रवासी 'माझा'च्या टीमसोबतच टोलधाडीला विरोध करतात. मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंच उत्तर नसतं. टोल देण्यास नकार दिल्याने खाजगी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी एका कुटुंबाची अडवणूक केली. या ठिकाणी अरेरावी करणारे प्रायव्हेट 'टॉप' सिक्युरिटी एजन्सीचे गार्ड वगळता एअरपोर्ट प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणीही दखल घेतली नाही. संपूर्ण देशात फक्त इथंच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते. मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एंट्री टोल घेतला जातो, असं या आरोपांवर एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी GVK चं म्हणणं आहे. एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार GVK कडे आहेत. प्रवाशांसाठी खास एलिव्हेटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एंट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो, असं GVK तर्फे सांगितलं जातं. 2014 साली 'माझा'च्याच बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली. खरंतर या टोल धाडीतून अनेक बड्या धेंडांचे हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे. यात कंत्राटदार आणि कमर्शियल कंपन्यांचं फावतं. मात्र तुम्हा-आम्हाला ही लूट निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्यायच उतर नाही. त्यामुळे यातून कोण सुटका करणार हा मोठा प्रश्नच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget