एक्स्प्लोर
फाशी की जन्मठेप? 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा
मुंबई: 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडं मुंबईसह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
सरकारी वकील रोहिणी सैलियन यांनी आरोपींनी कठोर शिक्षा करण्याची मागणी कोर्टात केली आहे. आरोपी मुझम्मील अन्सारी फाशी, तर साकीब नाचन याला जन्मठेप ठोठावण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली आहे.
या स्फोटाचा मास्टरमाईंड साकीब नाचनसह 10 आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मुझम्मील अन्सारीला बॉम्ब ठेवण्यासह एकूण 18 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आहे. आज या सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, 27 जानेवारी 2003 रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर 13 मार्च 2003 रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 27 जण जखमी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement