एक्स्प्लोर
मुंबईत 15 दिवसात लेप्टो आणि स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू
ल्या काही दिवसांमध्ये कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकरांना आजारी पाडलं आहे. विशेषत: डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकरांना आजारी पाडलं आहे. विशेषत: डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत डेंग्यू आणि स्वाईन फ्लूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षात पावसाळ्यात आणि पाऊस पडून गेल्यावर विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. याबाबतचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहीर केला जातो. असाच 1 ते 15 सप्टेंबर या पंधरा दिवसांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
पालिकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईतल्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मलेरियाचे 319, लेप्टोचे 21, स्वाईन फ्लूचे 6, गॅस्ट्रोचे 193, हेपेटायसिसचे 57 तर डेंग्यूचे 104 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये स्वाइनफ्लूने एक तर लेप्टोमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूसदृश्य आजाराचे एक हजार 536 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे 625, लेप्टोचे 27, स्वाईन फ्लूचा 1, गॅस्ट्रोचे 445, हेपेटायसिसचे 111, तर डेंग्यूचे 399 रुग्ण आढळले होते. त्यात साईन फ्लूमुळे एकाचा तर डेंग्यूमुळे 8 जणांचा अशा एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement