(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा, ट्वीट करत दिली माहिती
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना (Lata Mangeshkar) कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा झाली असून त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. लता मंगेशकरांनी स्वत:च ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
लता मंगेशकरांनी ट्वीट करत म्हटले आहे,"माझ्या तब्येतीत अंशत: सुधारणा झाली असून माझ्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका".
There is a marginal improvement in Lata Didi’s health and she continues to be in the ICU.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 25, 2022
Kindly refrain from spreading disturbing rumours or falling prey to random messages regarding Didi’s health.
Thank you
मंगेशकर कुटुंबीयांचे निवेदन
लता दीदींच्या तब्येतीत अंशत: सुधारणा झाली असून त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. त्या अद्याप आयसीयूमध्येच आहेत. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की, लता दीदींना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला 'कोविड न्यूमोनिया' असेही म्हणतात.
संबंधित बातम्या
Corona : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय कोणता? वैज्ञानिकांनी दिली महत्वाची माहिती
Republic Day : ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांनी गायलं राष्ट्रगीत, प्रजासत्ताक दिनाचं निमित्त, व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha