सत्तेतले एकत्र पक्ष निवडणुकीत वेगवेगळेही लढतात : सुनील तटकरे
मुंबईतील ठाकरे स्मारकात गुरुवारी (23 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासभर बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात भविष्यात रायगड पॅटर्नची चर्चा सुरु झाली. मात्र सत्तेतले पक्ष स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या लढल्याचा इतिहास आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकावर काल (23 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती जी बैठक झाली त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. या बैठकीचं नियोजन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात समन्वय राहावा, यासाठी आयोजित केलं होतं. कारण हे पक्ष राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असले तरी स्थानिक पातळीवरचे संबंध आजही तेवढे चांगले नाहीत.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. या तीन आमदारांसोबत राष्ट्रवादीचं फारसं पटत नव्हतं. म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचं नियोजन केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार दचकले, कारण बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार होती एवढीच माहिती शिवसेना आमदारांना होती
सत्तेत एकत्र पण, निवडणुकीत वेगवेगळे आतापर्यंत शिवसेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल, सत्तेत जरी एकत्र असले तर स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या लढल्याचा इतिहास आहे, असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. 2009, 2014 आणि 2019 साली निवडणुक वेगवेगळं चित्र पाहायल मिळालं. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत वेगवेगळे लढलेले दिसले. त्यामुळे आतापर्यंत सत्तेत जरी दोन पक्ष एकत्र असले निवडणुका वेगवेगळ्या लढले गेल्याचा इतिहास आहे.
काँग्रेसचं काय होणार? कालच्या बैठकीनंतर दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येणार यावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. पण भविष्यात निवडणुकांचा निर्णय घेताना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी निर्णय घेतील तोच अंतिम राहिल आणि स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांचं मत विश्वासात घेणं गरजेचं आहे. ते मत लक्षात घेतल्यानंतर निर्णय घेतले जाऊ शकतात पण तूर्तास कुठल्याही निवडणुका नाही, सध्या काँग्रेस आमच्यासोबत आहे, भविष्यातही एकत्र राहू, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
बैठकीत काय काय घडलं? महाविकास आघाडी असमन्वय असल्याचं वारंवार दिसून येतं, तसाच या बैठकीतही दिसून आला. रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे हे आम्हाला विश्वासात घेत नाहीत. पालकमंत्री नेमकं कोण आहे? अशी तक्रार शिवसेनेचा आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राष्ट्रावादीसोबत जुळवून घेत नाहीत असा सूर तटकरेंकडून आला. त्यामुळे एकंदरीत रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत फारसं आलबेल नसल्याने या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. पण त्यावर उद्धव ठाकरेंनी तोडगा काढला कारण एक मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून अशा अनेक तक्रारी येत असतात पण त्यावर सहज तोडगा काढण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यश आलं.समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांचे आदेश आपण भाजपला दूर ठेऊन सगळे एकत्र आलो आहोत आपल्याला भविष्यातही एकत्र राहायचं आहे, त्यामुळे मतभेद बाजूला ठेवत एकत्र राहण्यात महाविकास आघाडीचं भलं आहे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. त्यामुळे रायगड पॅटर्नची चर्चा सुरु झाली. रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र निवडणुका लढत होती, भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा सुरु झाली.
Raigad Pattern | काँग्रेला दूर ठेवण्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही : सुनील तटकरे