एक्स्प्लोर

बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या सुमारे 3700 बसेस विविध आगारात उभ्या आहेत.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस धाडत शुक्रवारी सकाळी यावर तातडीची सुनावणी ठेवली आहे.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या सुमारे 3700 बसेस विविध आगारात उभ्या आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात एक समिती स्थापन करावी. अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर कामावर जायचं नसेल तर बेस्ट वसाहतीतल्या खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. यामुळे भोईवाडा बेस्ट वसाहतीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि बेस्ट प्रशासनात जुंपली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं माघार घेतली. पण, कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी आज कामावर रुजू होणार असल्याचं संघटनेने म्हटलं, पण आज 11 हजारांपैकी फक्त 59 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने काल 500 बेस्ट बस रस्त्यावर उतरण्याची घोषणादेखील फोल ठरली आहे. परिणामी शिवसेनेच्या संघटनेतील बेबनाव समोर आला आहे.  संपाबाबत नामुष्की झाल्याची शिवसेनेची कबुली बेस्ट संपाबाबत झालेल्या नामुष्कीची शिवसेनेने कबुली दिली आहे. आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, असं शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितलं. बेस्ट संपातून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेची माघार तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: बेस्ट संपात लक्ष घालणार आहे. उद्या दौऱ्यावरुन आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेणार आहेत. शिवाय कनिष्ठ कामगार श्रेणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना समान श्रेणी, समान वेतन देण्यात येईल, अशी चर्चा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget