एक्स्प्लोर

हार्बर लाईनवर लोकल सेवा ठप्प; गाड्या रेल्वे ट्रॅक अन् स्थानकात उभ्या, चाकरमान्यांचे हाल

Harbour Local Train: गेल्या पाऊण तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या आहेत. 

Harbour Local Train: हार्बर लाईनवरील (Harbour Line Local) लोकल गेल्या 45 मिनिटांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या आहेत. गेल्या पाऊण तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या आहेत. हार्बर लाईन ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहे. सकाळी 7.30 वाजता हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने लोकल सुरु झाल्या आहेत. मात्र ठाण्याला जाणाऱ्या लोकल अजूनही रखडल्या आहेत. 

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता तयारी सुरु झाली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार पाचवी आणि सहावी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकातच संपेल. तर यापुढे मध्य रेल्वेमार्गावरील (Central Railway) फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. 

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव-

सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होईल. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येईल. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे. 

संबंधित बातमी:

मोठी बातमी: पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द होणार

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget