एक्स्प्लोर

Mumbai Local Update : मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे रेल्वे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

Thane Mumbai Local Update : पहाटेपासूनच मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.

Thane Mumbai Local Update : पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. ठाणे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल बंद पडली आहे. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत. 

मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत कोसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतोय. तसेच, पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत रुळांवर काही प्रमाणात पाणी साचलं होतं. अशातच आता लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूकही खोळंबली आहे. 

कालपासून ठाणे शहरांत प्रचंड पाऊस बरसत आहे. मुलीला पावसामुळे दरवर्षी ज्या ठिकाणी हमखास पाणी साचतं अशा वंदना सिनेमा चौकात आणि साचलेले बघायला मिळत आहे. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सध्या कमी आहे. त्यामुळे अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास भरतीच्या वेळेस पाण्याची पातळी वाढून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ शकतो. 

दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं अजूनही विश्रांती घेतली नाहीये. आज पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसामुळे राज्यभर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होतेय. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग तासागणिक वाढवला जातोय. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. तिकडचे लोणावळ्यात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन प्रशासनानं संध्याकाळी 5 नंतर भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घातली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यानं नदीकाठी नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यताAnil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
Embed widget