एक्स्प्लोर
Advertisement
महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप आहे.
ठाणे : राज्यातील पहिल्या महिला खाजगी गुप्तहेर अशी ख्याती असलेल्या रजनी पंडित यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॉल डिटेल रेकॉर्ड प्रकरणात ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची धक्कादायक माहिती आहे.
कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप आहे. ठाणे क्राईम ब्रँचने या रॅकेटचा काही दिवसांपूर्वी पर्दाफाश करुन चौघांना अटक केली होती.
रजनी पंडित यांना सीडीआर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने दादरमध्ये अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
रजनी पंडित यांना लेडी जेम्स बाँड असंही संबोधलं जातं. 1991 मध्ये त्यांनी अधिकृतपणे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement