एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या नावाने फसवणूक, तिघांना बेड्या
हे तिघे लोकांना फेसबुक आणि मेलवर गिऱ्हाईक म्हणून संपर्क साधून खेकड्याचं निळं रक्त परदेशी औषध कंपन्यांना हवं असल्याची बतावणी करायचे.
ठाणे : खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना ठाणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांमध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी, एजजोकू जोएल संडे उर्फ स्टॅनली संडे आणि ओनकांची अँथनी मडू अशी या तिघांची नावं आहेत.
हे तिघे लोकांना फेसबुक आणि मेलवर गिऱ्हाईक म्हणून संपर्क साधून खेकड्याचं निळं रक्त परदेशी औषध कंपन्यांना हवं असल्याची बतावणी करायचे. त्यानंतर विक्रेते म्हणून पुन्हा त्याच लोकांना संपर्क साधत आमच्याकडे स्वस्तात खेकड्याचं निळं रक्त उपलब्ध असल्याचं सांगायचे. या खरेदी विक्रीत फसवणूक झालेल्या लोकांना मोठ्या उत्पन्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रकमेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जायचे.
अशाप्रकारे फसवणूक झालेल्या एका इसमाने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास करुन या तिघांना अटक केली. या तिघांकडून दोन महागड्या गाड्या, 37 मोबाईल फोन्स, 21 डेबिट कार्ड्स, 28 चेक बुक, 47 विदेशी घड्याळं असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय आरोपींच्या घरी ब्रँडेड कपड्यांचे दोन हजार जोड आणि ब्रँडेड बुटांचे 200 जोड सापडले आहेत.
हे सगळं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यामुळे हे तिघे लोकांना फसवून त्यांच्या पैशांवर स्वतः किती चैनीत जगायचे, हे समोर आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांनी अशाप्रकारचे इमेल्स किंवा फेसबुक मेसेजेसना बळी न पडण्याचं आवाहन ठाणे पोलिसांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement