एक्स्प्लोर

Thane Budget | ठाणेकरांचे पाणी महागले! अर्थसंकल्पात 60 टक्के वाढ प्रस्तावित

ठाणे महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा 3,780 कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात पाणीपट्टीत प्रचंड वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

ठाणे : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतर ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादरीकरणास मुहूर्त सापडला असून महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी आज, बुधवारी दुपारी स्थायी समितीपुढे अर्थसंकल्प सादर केला आहे.

ठाणे महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा 3,780 कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात पाणीपट्टीत प्रचंड वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र इतर कोणत्याही करात वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. याच प्रमाणे 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा विचार देखील या अर्थसंकल्पात न केला गेल्याने शिवसेनेचे आश्वासन पुन्हा एकदा खोटे ठरले आहे.

3 हजार 300 कोटींचे कर्ज पालिकेवर असल्याने यंदा कोणतीही नवी योजना अथवा भरीव घोषणा न करता, या आधीची अपूर्ण विकास कामे भांडवली खर्चातून पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून महसुली खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे प्रभारी आयुक्त अहिवर यांनी सांगितले आहे.

ठाण्यातील एकूण अडीच लाख जोडण्यापैकी 40 हजार जोडण्यांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. मीटरनुसार 15 हजार लिटरपर्यंतच्या ग्राहकांना प्रति हजार लिटरसाठी पूर्वीच्या 7 रु.50 पैसे दराऐवजी 13 रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत प्रति हजार लिटरसाठी 10 रुपयांवरून 18 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 20 ते 24 हजार लिटरपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति हजार लिटलरला 15 रुपयांवरून 26 रुपये आणि 24 हजार लिटर्सच्या वर वापर करणाऱ्या ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 35 रुपये प्रति हजार लिटर असा टेलेस्कोपिक 40 टक्के दरवाढप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे.

स्मार्ट मीटर नसलेल्या झोपडपट्टी व चाळीतील ग्राहकांना पूर्वीच्या प्रतिकुटुंब प्रतिमाह 130 रुपये दराऐवजी 200 रुपये दर असेल तर मीटर नसलेल्या इमारतीतील सदनिकांना बिल्टअप क्षेत्रफळानुसार तब्बल 50 टक्के दरवाढ पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केली आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू

अखेर ठाणे मनपा आयुक्तांची एग्झिट ! सर्व कारभार सोडून निघाले देवदर्शनाला

ठाणे महापालिकेच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढण्याची भाजपची मागणी, मनपा आयुक्त आणि महापौरांना पत्र

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Sanjay Raut: गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विजय मिळवला, ही रिजीम चेंज अर्थात सत्ताबदलाची सुरुवात; खासदार संजय राऊतांचा दावा; सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही भाष्य, म्हणाले...
गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विजय मिळवला, ही रिजीम चेंज अर्थात सत्ताबदलाची सुरुवात; खासदार संजय राऊतांचा दावा; सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही भाष्य, म्हणाले...
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
Tiger Shroff Car Attack: पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली, VIDEO
पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली...

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Embed widget