एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू

पुण्यानंतर मुंबईत देखील कोरोना व्हायरस दोघांना झाल्याचं निदान झालं आहे. सध्या कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू करण्यात आला आहे.

ठाणे : जगभरात मृत्यूतांडव घडवलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव झालाय. पुण्याच्या कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबतचे दोन सहकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांचा आकडा सातवर पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये. तसेच तत्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये आजपासून 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू केल्याची घोषणा केली आहे. ठाणे जिल्हा मुंबई शहरालगत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणे जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनदिन अहवाल सादर करावयाचा आहे. Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण; राज्यात एकूण 7 करोनाग्रस्त जिल्हाप्रशासन सज्ज आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे, तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. Coronavirus | कोरोना आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधीमंडळाच्या परिसरात एकच चर्चा... औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात 'कोरोना'चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या' घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी केले आहे. Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा सतर्क : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget