एक्स्प्लोर

‘घातक’ तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात

1996 साली प्रदर्शित झालेला ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंग्जोपा यांनी त्या सिनेमात भूमिका साकारली होती.

मीरा-भाईंदर (ठाणे) : मीरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तात्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तात्या पटेलवर भाईंदरच्या एका महिलेला जिंवत जाळण्याच्या प्रयत्नात मकोका लागला होता. त्यानंतर तात्या फरार झाला होता. कोण आहे तात्य पटेल? अशरफ पटेल उर्फ तात्या गुलाम रसुल पटेल. एकेकाळी मीरा-भाईंदरमधील गुन्हेगारी जगतातील अनभिज्ञ सम्राट. मीर-भाईंदरमध्ये तात्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. तात्याच्या उंबरठ्यांवर स्थानिक नेते आणि गुंड सलामी ठोकतं असत, तर पोलिसांमध्येही त्याचा दरारा होता. ‘मोस्ट वॉंटेड’ असूनही तात्या खुलेआम जनता दरबार भरवत होता. ठाणे ग्रामीणच्या काशिमीरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्याला अंधेरीच्या यारी रोड येथून अटक केली. तात्या पटेलवर वेगवगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगली घडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, धाक-दपटशाही करुन जागा-जमीन बळकावणे असे 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाईंदरच्या एका जमिनीच्या वादामध्ये तात्याने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्याला मकोका लागला होता. याच प्रकरणात तात्याला गेल्या दीड वर्षांपासून फरार होता. सात भाऊ आणि एक बहीण अशी तात्या पटेलची एकूण आठ भावडं. त्यातील दोन भावांचा गॅंगवारमध्ये मृत्यू झाला. सर्वच भावांवर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्याची बहीणही लेडी डॉन या नावाने कुप्रसिद्ध होती. तात्या पटेल याच्यावर मकोकाच्या आगोदर 20 मे 2011 रोजी आपल्याच घरात बॉडीगार्ड सुल्ताना शेख याची हत्येचा गुन्हाही दाखल झाला होता. या गुन्ह्यात तो पाच वर्ष फरार होता. मीरा-भाईंदरमध्ये यांच्या कुंटुंबाला पटेल कंपनी म्हणूनही म्हटले जाते. ‘घातक’ सिनेमा आणि तात्या पटेल 1996 साली प्रदर्शित झालेला ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंग्जोपा यांनी त्या सिनेमात भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget