एक्स्प्लोर

महिला सुरक्षेसाठी रेल्वेची पावलं, टॉकबॅकने थेट गार्डशी संपर्क

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्‍चिम रेल्वेने काही महिन्यांपूर्वी आखलेला आराखडा अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. मेट्रो ट्रेनच्या धर्तीवरील आता उपनगरी लोकल ट्रेनमध्येही 'टॉकबॅक' प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे महिला प्रवाशांना संकटकाळी गार्डशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकेल. प्रायोगिक तत्त्वावर दोन लोकल ट्रेनमध्ये 'टॉकबॅक' प्रणाली बसवण्यात येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेच्या दोन लोकल गाड्यांतील महिलांच्या प्रत्येकी तीन डब्यांमध्ये ही प्रणाली बसवली जाईल. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या महालक्ष्मी कारशेडमध्ये ही प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे. कशी असेल टॉकबॅक प्रणाली? महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.

संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क

या यंत्रणेद्वारे गार्डला महिलांच्या डब्यातील परिस्थितीची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी वेळ मिळेल. लोकल पुढील स्टेशनवर थांबवावी की तात्काळ याची सूचना मोटरमनला देणंही गार्डला शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पॅनिक बटणचा गैरवापर मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅनिक बटण’ सुरु केलं. मात्र सुरुवातीच्या काळातच दोन वेळा त्याचा गैरवापर झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली होती. मध्य रेल्वेवर सलग दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गैरवापर झाल्याचे समोर आले. या बटणचा वापर झाल्याने दोन्ही दिवस लोकल सुमारे 15 मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मात्र या घटनांची चौकशी केली असता त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. अशावेळी एखादी लोकल 15 मिनिटे एकाच ठिकाणी कोणत्याही ठोस कारणाशिवाय उभी राहिल्यास संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. ऐन गर्दीची वेळ असल्यास प्रवाशांचे प्रचंड हाल होतात.

संबंधित बातम्या :

महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी?

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पॅनिक बटण

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Tukaram Mundhe: ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
CJP PM Modi and Sandeep Deshpande: झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Embed widget